SIP ची पॉवर कशी वाढवायची ? (भाग २)

बरेचदा आपण लहान SIP नि सुरुवात करतो व विचार करतो कि नंतर वाढवू कि SIP, कुठे घाई आहे?

पण आपल्याला वेल्थ जमवण्यासाठी चक्रवाढ व्याजाची (कंपाऊंड इंटरेस्ट) गरज असते मागच्या भागात आपण, चक्रवाढ व्याज कसे काम करते यावर काही उदाहरणे पहिली, चला आणखी काही उदाहरणे पाहूया !

समजा तुमच्या रिटायरमेंट ला 30 वर्षे बाकी आहेत, खालील उदाहरणे पहा !

उदाहरण १

पहिल्या 10 वर्षात तुम्ही 5000 ची SIP केलीत, 10 वर्षानंतर वाढवून ती 15000 केलीत व त्यानंतर 10 वर्षांनी 50000 प्रति महिना SIP तुम्ही इनवेस्ट करताय !

5000 SIP पहिली - 10 वर्षे

15000 SIP नंतरची- 10 वर्षे

50000 SIP नंतरची - 10 वर्षे

(परतावा जर 15% प्रमाणे)

30 वर्षांनंतर जवळपास 6 करोड रुपये जमा होतील (गुंतवणूक = 84 लाख रुपये)

उदाहरण २

तुम्ही 10000 रुपयाची SIP 30 वर्षे सुरु ठेवलीत.

10000 SIP- संपूर्ण 30 वर्षे (परतावा जर 15% प्रमाणे)

30 वर्षांनंतर जवळपास 6 करोड रुपये जमा होतील (गुंतवणूक = 36 लाख रुपये)

उदाहरण ३

तुम्ही 14000 ची SIP पहिल्या फक्त 10 वर्षांसाठी केलीत व नंतर ती बंद करून, जमारक्कम तशीच 30 वर्षापर्यंत वाढू दिलीत.

14000 SIP पहिली- 10 वर्षे (परतावा जर 15% प्रमाणे)

30 वर्षांनंतर जवळपास 6 करोड रुपये जमा होतील (गुंतवणूक = 16 लाख 80 हजार रुपये)

आपण वरील सर्व उदाहरणात पहिले कि जवळपास 6 करोड रुपये जमा होत आहेत परंतु गुंतवणूक जर पडताळून पहिली तर लक्षात येईल कि गुंतवणुकीत जमीन - आस्मानाचा फरक आहे.

आता गुंतवणुकीत हा एवढा फरक का आला तर उत्तर सोप्पे आहे तुमची पहिली 10 वर्षे गुंताणूकी साठी सर्वात महत्वाची आहेत कारण या पहिल्या 10 वर्षाच्या गुंतवणुकीवर सर्वात जास्त चक्रवाढ व्याज तयार होते.

तुम्ही पहिल्या 10 वर्षात जर लहान SIP केलीत तर ती भरून काढण्यासाठी भरपूर मोठी SIP गुंतवणुकीचा भूर्दंड तुम्हाला नंतरच्या वर्षात भरावा लागेल.

आता तुम्हीच ठरवा तुम्हाला वरील कोणत्या उदाहरणाप्रमाणे गुंतवणूक करायची आहे ! बाकी श्री (चक्रवाढ व्याज) समर्थ आहे !