तुमचा Mediclaim आहे का ? किव्वा Mediclaim घेणार आहात का ? (भाग २)

Mediclaim घेताना काय काळजी घेतली पाहिजे तर खालील बाबी जाणून घ्या! मागच्या भागात आपण 4 बाबी पाहिल्या आता पुढील 3 बाबी पाहू

5. Exclusions ?

Mediclaim घेताना बऱ्याच लोक्कांना काय कव्हर होईल या बाबत माहिती होते पण बहुतेकांना काय कव्हर होणार नाही या बाबत काहीहि माहिती नसते.

Exclusions म्हणजे अशा गोष्टी ज्या पॉलिसी मध्ये कव्हर होत नाहीत.

Exclusions मध्ये 2 प्रकार असतात स्थायी (Permanent) आणि तात्पुरता (Temporary).

स्थायी Exclusions- जवळपास सर्व पॉलिसी मध्ये स्थायी Exclusions त्याच त्याच असतात.

तात्पुरताचे Exclusions- काही exclusions हे काही काळापुरता असतात जसे कि "पॉलिसी मध्ये Catract Operation पहिली 2 वर्षे कव्हर होणार नाही". काही पॉलिसीज मध्ये कधी कधी काही वेगळे Exclusions असू शकतात.

Conclusion-

प्रत्येक पॉलिसीमध्ये स्थायी (Permanent) आणि तात्पुरता (Temporary) exclusions असतात. त्याची पूर्णपणे कल्पना तुम्हाला असणे फार महत्वाचे आहे.

पॉलिसी आल्या नंतर तुम्ही exclusions व इतर गोष्टी (पॉलिसी Wordings) पूर्णपणे वाचून घ्या. जर तुम्हाला मान्य नसतील तर तुम्ही 15 दिवसाच्या आत पॉलिसी परत करु शकता. इन्शुरन्स कंपनी बिनशर्त तुमचे सर्व पैसे परत करते.

6. Renewability वय ?

आज अद्यावत वैद्यकीय सेवा व औषधे यामुळे आज भारतात जगण्याची वयोमर्यादा फार वेगाने वाढते आहे. त्यामुळे आज आपण मोठं म्हातारपण (साठीनंतर जास्त वर्षे) जगणार आहोत आणि Mediclaim ची सर्वात जास्त गरज हि आपल्याला म्हातारपणातच असते.

Mediclaim घेताना Renewability वय जाणून घेने फार महत्वाचे आहे. Renewability वय म्हणजे किती वर्षा पर्यंत तुम्ही तुमचा Medicliam चालू ठेवू शकता. जर त्यावर काही वयाची अट असेल तर तुम्ही म्हातारपणात तुमचा Mediclaim चालू ठेऊ शकणार नाहीत. आणि ते तुमच्यासाठी फार घातक आहे. कारण mediclaim ची सर्वात जास्त गरज हि त्यावेळीच असते.

तेव्हा पुढच्या वेळी Mediclaim घेताना renewable वय नक्की विचारून घ्या

Conclusion-

Mediclaim घेतांना तो 'Lifetime Renewable' आहे का हे तपासून घ्या. Renewability वयाची कोणतीही अट नसणारा mediclaim घेणेच उत्तम ! त्यामुळे तुमचं कव्हर म्हातारपणात नक्कीच कामाला येईल.

7. पूर्व (Pre- Existing) आजार ?

बहुतेक Medicliam पोलिसीज ह्या पूर्व आजारांना (Pre-existing diseases) लगेच कव्हर करत नाही त्यामध्ये 2 ते 3 वर्ष वाट पाहण्याची अट असते.

पण लक्षात घ्या कि पूर्व आजार म्हणजे फक्त ते आजर नाहीत जे तुम्हाला Mediclaim घेताना असतात, पूर्व आजारात तेही आजार मोडतात जे तुम्हाला Medicliam घेतल्या नंतर झालेले आहेत पण ते पूर्व आजारांवर अवलंबून आहेत.

खालील उदाहरण लक्षात घ्या !

उदाहरण-

सतीश ला 'मधुमेह' आहे. सतीश ची पॉलिसी 'पूर्व आजार' 2 वर्षांनी कव्हर करते म्हणजे ती 'मधुमेह' 2 वर्षांनी कव्हर करणार, हे सतीश ला मान्य आहे. पोलिसी घेतल्या नंतर एका वर्षांनी सतीशच्या जास्त मधुमेहामुळे त्याला किडनी प्रॉब्लेम झाल्याचे समजले.

पण किडनी प्रॉब्लेम हा पूर्व आजार 'मधुमेह' वर अवलंबून असल्यामुळे तो पूर्व आजार म्हणूनच पकडला जातो. त्यामुळे Medicliam पॉलिसी हि मधुमेह व किडनी प्रॉब्लेम दोघाना 2 वर्षांनीच कव्हर करते. त्यामुळे 1 वर्षांनी झालेल्या या आजाराला सतीशला medicliam मधून काहीहि मदत होणार नाही.

Conclusion-

Mediclaim निवडताना फार महत्वाचे आहे कि तुम्ही असा Medicliam निवडा जो पूर्व आजारांना (Pre-existing diseases) लवकरात लवकर कव्हर करेल.

तर या 7 फार महत्वाच्या बाबींवर विचार करूनच Mediclaim घ्या. फक्त कमी प्रीमियम किव्वा वेगवेगळ्या ऑफर्स यांना भाळून कोणताही medicliam घेऊ नका.