जाहिराती, ऑनलाइन बाजार, आणि शिक्षणामुळे आजकाल बरीच लोक जागरूक झालेली आहेत. आज Mediclaim (हेल्थ इन्शुरंस) घेण्याकडे कल वाढत चाललेला आहे.
आता प्रत्येक Mediclaim कंपनी आपलं प्रॉडक्ट चांगले आहे असेच म्हणणार मग कोणता Mediclaim घ्यावा, कोणता घेऊ नये?
Mediclaim घेताना काय काळजी घेतली पाहिजे तर खालील बाबी जाणून घ्या!
1. पोलिसी Individual कि Floater ?
Mediclaim हा 2 मुख्य प्रकारात मोडतो तुम्ही पोलिसी Indivaidual म्हणजे एकटयाच्या नावे किव्वा Floater म्हणजे कुटुंबामधील सर्व लोकांच्या नावाने घेउ शकता.
Floater पोलिसी घेताना इन्शुरन्स कंपनी हि कुटुंबातील मुख्य किव्वा वयांने सर्वात जास्त असणाऱ्या व्यक्तिच्या नावाने ती पोलिसी इशु करते. तिला प्रायमरी पर्सन असे म्हणतात.
पण सर्वात महत्वाची गोष्ट जर कुटुंबातील ती मुख्य व्यक्ती काही कारणांनी दगावली किव्वा Specific Age लिमिट ला पोचली तर Floater पोलिसी बंद होते. ह्या floater पॉलिसी मध्ये असलेली इतर व्यक्ती या पॉलिसीला परत चालू ठेवू शकत नाहीत.
Floater पॉलिसी मध्ये जर लहान मुले असतील तर ती त्या पॉलीसी मध्ये आपल्या वयाच्या 21-25 वर्षापर्यंतच राहू शकतात नंतर त्यांना वेगळी पोलिसी घेणे भाग आहे.
Individual पॉलिसी हि व्ययक्तीत असल्यामुळे तिचा इतर लोकांशी समंध येत नाही.
Conclusion- फक्त प्रीमियम कमी पडते म्हणून Individual किव्वा Floater पॉलिसी निवडू नका. नीट पडताळा करा अथवा Advisor ची मदत घ्या.
2. Sub- लिमिट ?
काही पॉलिसी मध्ये रूमचे भाडे, डॉक्टर चार्जेस किव्वा रोगांवर Sub लिमिट म्हणजे मर्यादा असतात.
उदाहरण-
रुपेश ची 5 लाखाची Mediclaim पॉलिसी आहे पण रूम रेन्ट हे 1% दिलेले आहे. म्हणजे आता रुपेश हॉस्पिटल मध्ये 5 लाखाच्या 1% म्हणजे ₹ 5000 चीच रूम वापरू शकतो. पण त्याला जर उपचारासाठी ₹ 12000 रुपयाची रूम वापरावी लागली तर त्याला पॉलिसी मधून रूमसाठी दिवसाला ₹ 5000 रुपयेच मिळतील बाकी त्याला स्वतः खर्च करावे लागतील.
अशाच Sub लिमिट (मर्यादा) कदि कदी काहि रोगांवरही असतात.
Conclusion-
पॉलिसी किती रुपयाची आहे हे महत्वाचे आहे पण Sub लिमिट आहेत का ते आधी जाणून घ्या. Sub लिमिट असलेल्या Medicliam पॉलिसी शक्यतो टाळा!
3. ऑफिस Mediclaim?
"तुमचा Mediclaim आहे का ?" अस विचारल्यावर बरीच नोकरी करणारी लोक "हो" म्हणून उत्तर देतात. कारण असते कि कंपनी तर्फे दिला जाणार mediclaim !
कंपनी तर्फे Mediclaim असण्यात काही तोटे आहेत ते लक्षात घ्या !
जेव्हा आपण एखादी Mediclaim पोलिसी 3 वर्षांहून अधिक वापरतो तेव्हा तिचे खरे फायदे आपल्याला मिळतात. जसे आपल्याला आधीपासून असलेले आजार कव्हर होतात, तुम्ही जर क्लेम नाही केलत तर तुम्हाला नो क्लेम बोनस म्हणजे तुमचे Mediclaim कव्हर वाढते.
पण नॉर्मली माणूस एका कंपनीत सादारणतः 3-4 वर्षे काम करतो. त्यामुळे त्याचे पूर्व आजार कव्हर होतच नाहीत. तसेच त्याला 'नो क्लेम बोनसचा फायदा घेता येत नाही. कंपनी तर्फे असणाऱ्या mediclaim मध्ये बहुतेकदा कॉ पेमेंट (पुढाचा मुद्दा पहा*) असते आणि सर्वात मोठे नुकसान म्हणजे आपल्या रिटायरमेंट च्या काळात आपल्याला मोठे कव्हर घेणे खूप खर्चिक होते.
Conclusion-
ऑफिस मधील medicliam वाईट नक्कीच नाही पण तुम्ही स्वतःला विचारा कि तुम्ही किती वर्ष कंपनीत थांबणार आहात जर उत्तर जास्तीत जास्त 3-4 वर्षे असेल तर स्वतःचा mediclaim काढणे कधीही उत्तम!
4. कॉ पेमेंट ?
कॉ-पेमेंट हा ऑप्शन पाहणे फार महत्वाचे आहे. बहुतेकदा हा ऑप्शन आपण जेथे नोकरी करतो त्या कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या Mediclaim पॉलिसी मध्ये आढळतो. कॉ पेमेंट मध्ये % दिलेले असतात.
कॉ पेमेंट मध्ये इन्शुरंस कंपनी पूर्ण क्लेम कधीच देत नाही ती काही % मध्ये क्लेम देते बाकी रक्कम ज्यांनी mediclaim घेतला आहे (Insured) त्याला भरावी लागते.
उदाहरण- अजय ने 20% कॉ पेमेंट असलेला mediclaim खरेदी केला व त्याचे इन्शुरन्स कव्हर 3 लाखाचे होते. त्याच वर्षात त्याला अपघात झाला व खर्च 2 लाख रुपये झाला पण इन्शुरन्स कंपनी त्याला पूर्ण क्लेम देणार नाही कारण कॉ पेमेंट आहे 20% !
त्याला कंपनीकडून जास्तीतजास्त 1 लाख 60 हजार रुपये मिळतील (2 लाख X 20%) बाकी 40 हजार रुपये त्याला स्वतः भरावे लागतील.
Conclusion-
कॉ पेमेंट असलेला Mediclaim हा स्वस्त असतो पण उद्या मेडिकल ट्रीटमेंट ला किती खर्च येईल सांगता येणार नाही. त्यामुळे Mediclaim निवडताना कॉ पेमेंट न घेतलेलं चांगले.