सतीश आपल्या ऑफिस मधील मित्रांना प्रमोशनची पार्टी देत होता.
सतीश - "अजून काही विचार केलेला नाही पण गुंतवणूक करायचा विचार करतोय"
सतीश चा मित्र - "काय बोलतोस, अरे माझा भाऊ आत्ताच कोणत्यातरी इन्शुरन्स कंपनीत जॉईंट झाला आहे. आम्ही सगळ्यांनी त्याच्याकडेच गुंतवणूक केलेली आहे तू पण टाक एखाद्या पोलिसी मध्ये पैसे, माझा भाऊ तुला त्याला मिळणाऱ्या कमिशन मधून पण काही पैसे तुला परत देईल."
सतीश उत्साहित होऊन- " ग्रेट, उद्या त्याला भेटायला सांग मी तू गुंतवणूक केलेल्या पोलिसीतच पैसे गुंतवणूक करतो!
सतिशचा मित्र - ओके नक्कीच !
वरील सतीशचे उदाहरण आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते. आपण गुंतवणुकीचे धडे कुणाकडनाही घेतो आणि मग चढाओढ सुरु होते ती वेगवेगळे गुंतवणूक प्रॉडक्ट घ्यायची.
मी मागच्या महिन्यात एका गृहस्तांकडे रिटायरमेंट प्लान्निंग साठी गेलो होतो त्यांनी आधी 18 गुंतवणूक पॉलिसी घेतल्या होत्या आणि तरी सुद्धा ना धड ते नीटपणे प्रोटेक्टेड (इन्शुरंस) होते ना गुंतवणूक नीट होती. 'एक ना धड बारा भर चिंध्या' अशी त्यांची अवस्था होती.
लक्षात घ्या तुमच्या कडे गुंतवणुकीसाठी किती पैसे आहेत याहून महत्वाचे आहे कि तुम्ही कुठे गुंतवणूक करत आहात !
तुम्हाला जर आपल्या गुंतवणुकीवर चांगला आणि सुरक्षित परतावा मिळवायचा असेल तर पुढील प्रश्न स्वतःला गुंतवणुक करण्याआधी विचारा
1. माझ्या गुंतवणुकीचा उद्देश (इन्वेस्टमेंट ऑब्जेक्टिव्ह) काय आहे ?
'मुलीच शिक्षण, नवीन घर, नवीन गाडी, किव्वा लवकर रिटायरमेंट' गुंतवणुकीचा उद्देश सर्वात महत्वाचा आहे त्यासाठी तुम्ही हे गुंतवणुकीचे कष्ट घेत आहात.
जर तुम्ही गुंतवणुकीला उद्देश दिला नाहीत तर जेव्हा पण जीवनात गरज निर्माण होईल तेव्हा तुम्ही तुमची गुंतवणूक काढून घ्याल त्यामुळे तुमच्या आयुष्यातील कोणतीही मोठी स्वप्ने पूर्ण होणार नाहीत आणि आपले आयुष्य कर्ज फेडण्यात जाईल.
टीप- गुंतवणूक करताना तिला वेगवेगळे उद्देश (इन्वेस्टमेंट ऑब्जेक्टिव्ह) प्रमाणे वर्गीकरण करून करा नक्कीच फायदा होईल.
2. मी पैस्याची बांधिलकी पाळू शकेन का ?
तुम्ही एकदाच गुंतवणूक किव्वा दर महिन्याला गुंतवणूक करत असाल पण तुम्ही ती बांधिलकी पाळू शकणार आहात का ? कि आज मित्र गुंतवणूक करतोय म्हणून तुम्ही गुंतवणूक करताय!
टीप- गुंतवणूक करताना तुमचे महिन्याचे खर्च तसेच आणीबाणीचा (EMERGENCY) खर्च बाजूला काढून नंतरच गुंतवणूक करा!
3. मला माझा उद्देश पूर्ण करण्यासाठी किती गुंतवणुक करावी लागेल?
प्रत्येकाला असे वाटते कि आपण आपल्या मुलांना डॉक्टर किव्वा इंजिनिअर बनवावे पण आज शिक्षण महाग होत चालले आहे.
समजा तुम्हाला जर मुलांचा शिक्षणाचा खर्च इथून 15 वर्षांनी 50 लाख येणार आहे मग तुम्हाला तुमची मुलांसाठी केलेली गुंतवणुक 15 वर्षांनी किती रुपये मिळवून देणार आहे हे माहिती नको का ?
टीप- प्रत्येक गुंतवणूक उद्देशाला पडताळून पहा कि तुमचा उद्देश हा किती कॉस्टली आहे आणि तुमची गुंतवणूक तुम्हाला तेवढे पैसे मिळवून देणार आहे कि नाही?
4. माझी रिस्क प्रोफाइल काय आहे?
बरीचशी लोक शेअर मार्केट वाढायला लागले कि आकर्षित होऊन गुंतवणूक करतात आणि शेअर मार्केट खाली यायला लागले कि शेअर मार्केट बरोबर त्यांचे ब्लड प्रेशर सुद्धा वरती खाली व्हायला लागते, सांगायची गोष्ट म्हणजे प्रत्येक माणसाची रिस्क घेण्याची क्षमता वेगवेगळी असते.
टीप- फक्त रिटर्न पाहून गुंतवणूक करू नका, गुंतवणुक करताना स्वतःची आर्थिक परिस्थिती, आपला उद्देश व आपली रिस्क घेण्याची ताकद यावर गुंतवणूक प्रॉडक्ट निवडा.
5. माझा फिनॅनसिएल Advisor तेवढा क्षमतेचा आहे का?
भरपूर लोक आज गुंतवणूक करतात कोणाच्या संगण्यांने तर मित्र, काका, मामा, बाबा किव्वा दादा! आज या व्यक्ती वाईट नाहीत पण प्रत्येकाच्या क्षमता व अपेक्षा वेगवेगळ्या आहेत.
काही लोंकाकडे आपले फिनॅनसिएल Advisor आहेत. पण त्यांच्यावर आपला आंधळा विश्वास बरोबर आहे का ? आपण त्याची क्षमता जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का?
लक्षात घ्या तुम्हाला चांगलं पोहायला येण्यासाठी तुमचा प्रशिक्षक पट्टीचा पोहणाराच असला पाहिजे. मी मानतो कि आपली गुंतवणुकीची ताकद हि आपल्या Advisor च्या ताकदीवर डिपेंड असते.
टीप- आपण आपल्या फिनॅनसिएल Advisor ला विचारले आहे का कि तो जी गुंतवणूक आपल्याला सुचवत आहे त्यात त्याने स्वतःची किती गुंतवणूक केली आहे? त्याची सिप, गुंतवणूक व इन्शुरन्स पोलिसिझ किती आहेत? त्याची शैक्षणिक पात्रता काय आहे?
वरील प्रश्न आपल्या Advisor ला गुंतवणूक करण्या आधी विचारा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
पुढील प्रश्न नंतरच्या भागात पाहू !